उल्हासनगरात एमडी पावडरसह एकाला अटक! ४० ग्राम पावडरची किंमत २ लाख ८० हजार

By सदानंद नाईक | Updated: September 15, 2023 14:07 IST2023-09-15T14:07:33+5:302023-09-15T14:07:52+5:30

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

One arrested with MD powder in Ulhasnagar! Price of 40 grams of powder is 2 lakh 80 thousand | उल्हासनगरात एमडी पावडरसह एकाला अटक! ४० ग्राम पावडरची किंमत २ लाख ८० हजार

उल्हासनगरात एमडी पावडरसह एकाला अटक! ४० ग्राम पावडरची किंमत २ लाख ८० हजार

उल्हासनगर : कॅम्प नं-१, आयडीआय कंपनीच्या गेटसमोर गुरवारी रात्री ११ वाजता पवन सुशील झा याला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० ग्राम वजनाची एमडी पावडर मिळून आली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड स्टेशन आयडीआय कंपनीच्या गेटनसमोर एक जण एमडी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. त्यांनी आयडीआय कंपनी गेट परिसरात सापळा रचून पवन सुशील झा-१९ या तरुणाला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम एमडी पावडर मिळून आली.

या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी एमडी पावडर प्रकरणी पवन झा यांच्याकडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One arrested with MD powder in Ulhasnagar! Price of 40 grams of powder is 2 lakh 80 thousand