नाशकात प्रतिबंधित गुटख्यासह एकास अटक!

By नामदेव भोर | Updated: July 6, 2023 14:48 IST2023-07-06T14:48:40+5:302023-07-06T14:48:54+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ५) राजीवनगर रस्त्यावरून एकजण गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती.

One arrested with banned Gutka in Nashak! | नाशकात प्रतिबंधित गुटख्यासह एकास अटक!

नाशकात प्रतिबंधित गुटख्यासह एकास अटक!

नाशिक : राजीवनगर रस्त्यावरून दुचाकीवरून विक्रीसाठी गुटखा घेऊन जाणाऱ्या संशयित आरोपी मुस्तकीन इसाक राजे याला राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणात अटक केली असून त्याच्याकडून सुमारे २४ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ५) राजीवनगर रस्त्यावरून एकजण गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती. त्यानुसार दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने राजीवनगर येथील साईबाबा मंदिरात रस्त्यावर सापळा रचला असताना संशयित मुस्तकीन इसाक राजे ( ४२, रा. सफायर सोसायटी वडाळा रोड) राजीवनगर कडून दुचाकी ( एम एच १५ एच डब्ल्यू ५७८६) वरून येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

मुस्तकीन इसाक राजेची चौकशी केली असता त्याच्या गाडीवर महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडून २४ हजार रुपयांचा गुटका ५ हजार रुपयांचा मोबाईल, व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One arrested with banned Gutka in Nashak!