शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

जीएसटीने जप्त केलेल्या १८ लाख किंमतीच्या ब्रॅण्ड सिगारेटची चोरी, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 4:13 PM

Crime News :१८ लाखाच्या सिगारेट चोरी प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रणय तिडके नावाच्या इसमाला अटक केली.

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील उधोगविहार मधील गाळा नं-२ मध्ये १८ लाख २२ हजार किंमतीचा ब्रॅण्ड सिगारेटचा साठा ९ ते १० मार्च २०१९ दरम्यान डायरेक्टर जनरल ऑफ गुडस् अँण्ड सर्व्हिसेस टॅक्स इंटेलिजन्स झोनल (जीएसटी) युनिट अहमदाबाद यांनी जप्त करून सीलबंद केला

उल्हासनगर : जीएसटीच्या अहमदाबाद युनिटने जप्त केलेला १८ लाख २२ हजार रुपये किंमतीचा ब्रॅण्ड सिगारेटची उघोगविहार मधील सीलबंद गाळ्यातून चोरी झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग -१ चे अधिकारी करीत आहेत. विभागाला आतापर्यंत एकाला अटक करण्यात यश आले आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील उधोगविहार मधील गाळा नं-२ मध्ये १८ लाख २२ हजार किंमतीचा ब्रॅण्ड सिगारेटचा साठा ९ ते १० मार्च २०१९ दरम्यान डायरेक्टर जनरल ऑफ गुडस् अँण्ड सर्व्हिसेस टॅक्स इंटेलिजन्स झोनल (जीएसटी) युनिट अहमदाबाद यांनी जप्त करून सीलबंद केला. दरम्यान १३ एप्रिल २०१९ रोजी गाळ्यातील जप्त व सीलबंद केलेल्या सिगारेटची चोरी झाल्याचे उघड झाले. गाळा मालक व फिर्यादी जितेंद्र बलदेव माखेजा यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे तक्रार दाखल झाली नसल्याची प्रतिक्रिया ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग -१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या नं-१ च्या युनिटने तपासचक्र सुरू केले.

छोटा राजन टोळीच्या हस्तक खंडणी प्रकरणात ६ वर्ष होता फरार, पुण्यात केली अटक 

 

१८ लाखाच्या सिगारेट चोरी प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रणय तिडके नावाच्या इसमाला अटक केली. त्याला आज न्यायालय समोर उभे केले असता, ६ फेब्रुवारी प्रयत्न पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांनी दिली. सिगारेटच्या चोरीनंतर ८ महिन्यांनी गुन्हा दाखल होऊन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला अटक केली असून यामागचे एका टोळीची शक्यता व्यक्त होत आहे. मालर्वो लाईट स्वीझरलँड, एसेगोल्ड, एसेलाईट व गोल्डफ्लेक्स नावाच्या सिगारेटचा समावेश यामध्ये आहे. जीएसटी अहमदाबाद युनिटने जप्त व सीलबंद केलेल्या गाळ्यातून सिगारेटची चोरी झाल्याने, एकूणच संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरGSTजीएसटीRobberyचोरीCigaretteसिगारेट