नायजेरियनच्या हत्येप्रकरणी एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 19:11 IST2019-10-27T19:10:20+5:302019-10-27T19:11:58+5:30
तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच परिसरातील राहणाऱ्या एकाला अटक केली.

नायजेरियनच्या हत्येप्रकरणी एकाला अटक
नालासोपारा - पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १६ ऑक्टोबरला मध्यरात्री झालेल्या नायजेरियनच्या हत्येप्रकरणी तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याच परिसरातील राहणाऱ्या एकाला अटक केली.
नालासोपारा पूर्वेकडील ९० फुटी रस्त्यावरील प्रगतीनगर परिसरात जोसेफ नावाच्या नायजेरियनचा मारहाण झाल्याने संशयास्पद मृत्यू झाला होता. जोसेफ याचा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचा वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानंतर गुरूवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून वेगाने तपासाला सरूवात केली. शुक्र वारी या हत्येप्रकरणी तपास अधिकारी आाणि पोलीस निरीक्षक आनंद मुदलियार यांना माहिती मिळाल्यानंतर याच परिसरातून नासीर खान (३२) याला बेड्या ठोकल्या. नासीरला शनिवारी सकाळी वसई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्याची हत्या झाली त्या नायजेरियन नागरिकाचे नाव व त्याचा राहण्याचा पूर्ण पत्ता याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान तुळींज पोलिसांसमोर उभे आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.