राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 00:30 IST2022-08-17T00:29:23+5:302022-08-17T00:30:14+5:30
संबंधित घरावर राष्ट्रीय ध्वजाच्या वर पाकिस्तानच्या ध्वजाशी मिळता जुळता ध्वज लावल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले अन्...

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी फोंड्यात एकाला अटक
फोंडा - हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत आपल्या घरावर लावलेल्या तिरंगा ध्वजाच्या वर, पाकिस्तानशी साम्य असणारा ध्वज लावून भारतीय ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कयाबुद्दीन अली (वय 43. राहणार झिगंडीमळ कुर्टी या इसमाला रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधित घरावर राष्ट्रीय ध्वजाच्या वर पाकिस्तानच्या ध्वजाशी मिळता जुळता ध्वज लावल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. सदरची बातमी समाज माध्यमावर व्हायरल होताच त्या भागात काही वेळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन घरातील लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलीस पोहोचले तेव्हा, मुख्य संशयित कामानिमित्त बाहेर होता. संध्याकाळी त्याला कामाच्या ठिकाणहून ताब्यात घेण्यात आले व घरातील इतर लोकांना सोडण्यात आले. या संबंधी चौकशी चालू असून त्या इसमाविरुद्ध राष्ट्रध्वज अवमान कलम 1971 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.