ब्राऊनशुगरसह एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 16:29 IST2019-04-29T16:27:32+5:302019-04-29T16:29:11+5:30
गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे.

ब्राऊनशुगरसह एकास अटक
नालासोपारा - तुळींज पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाल्यावर हजारो रुपयांच्या ब्राऊनशुगरसह एकाला अटक केली असून गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहिती मिळाली होती तुळींज रोडवरील मराठी जिल्हा परिषद शाळेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ब्राऊन शुगर विकण्यासाठी कोणी येणार आहे. सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मराठी शाळेजवळ विकण्यास आलेला कैलाश नाडर (35) याला पकडले असून त्याच्याकडून 80 हजार रुपये किंमतीचे 16 ग्राम वजनाचे ब्राऊनशुगर जप्त केले आहे. कोणाला विकण्यासाठी व कुठून आणले होते याचा शोध घेत पुढील तपास करत आहे.