बलात्कार प्रकरणी शेकापच्या पदाधिकाऱ्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 23:01 IST2019-02-06T23:01:01+5:302019-02-06T23:01:29+5:30

नोकरीच्या अथवा लग्नाच्या बहाण्याने महिलांची फसवणूक करून बलात्कार करणाऱ्या शेकाप च्या पदाधिकाऱ्याला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे.

one arrest for rape on women | बलात्कार प्रकरणी शेकापच्या पदाधिकाऱ्याला अटक 

बलात्कार प्रकरणी शेकापच्या पदाधिकाऱ्याला अटक 

 नवी मुंबई : नोकरीच्या अथवा लग्नाच्या बहाण्याने महिलांची फसवणूक करून बलात्कार करणाऱ्या शेकाप च्या पदाधिकाऱ्याला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. श्रीराग कमलासनन असे त्याचे नाव असून तो उलवेचा राहणारा आहे.

पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असलेल्या महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेला नोकरीच्या बहाण्याने विश्वासात घेऊन लग्नाचे अमिश दाखवून त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध केले. त्यानंतर मात्र आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आल्याने तिने त्याच्याशी संपर्क तोडला होता. मात्र यानंतरही श्रीराग कमलासनन हा तिला शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करत होता. याकरिता त्याने तिच्या लहान मुलाच्या अपहरणाचा देखील प्रयत्न केला. यामुळे सदर महिलेने त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली असता, त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यानच त्याच्याकडील मोबाईल व लॅपटॉप मध्ये इतरही काही महिला व मुलींचे फोटो आढळून आल्याने त्याने अशा अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: one arrest for rape on women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.