शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 12:42 IST

दार ढकलून एक महिला घरमालकांच्या घरी आरतीला गेली असताना चोरट्याने त्यांच्या घरातील दागिने चोरुन नेले.

ठळक मुद्देकुलूप लावूनच बाहेर पडण्याचे आवाहन

पुणे : गौरी गणपतीच्या दिवसात शेजारी, पाजार्‍यांनी आरतीला बोलावले तर अनेक जण जात असतात. शेजारीच तर जायचे असे म्हणून नुसते दार ढकलून लोक जातात. याच संधीचा गैरफायदा घेऊन चोरटे घरातील दागिन्यांवर डल्ला मारण्याची शक्यता आहे. नव्हे असा प्रकार लोहगावमधील डिफेन्स कॉलनीत घडला आहे. दार ढकलून एक महिला घरमालकांच्या घरी आरतीला गेली असताना चोरट्याने त्यांच्या घरातील १ लाख ४२ हजार ५५० रुपयांचे दागिने चोरुन नेले.याप्रकरणी निरगुडी रोडवरील डिफेन्स कॉलनीतील २१ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या राहत असलेल्या घरमालकांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना शनिवारी करण्यात आली. त्यावेळी त्यांना आरतीला बोलविले होते. त्या घराचे दार ढकलून पतीसह घरमालकाकडे आरतीला गेल्या. त्यानंतर गल्लीत राहणार्‍या आणखी एका घरी गेले. या दरम्यान चोरट्याने मुख्य दरवाजावाटे घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरवर ठेवलेली ड्रॉव्हरची चावी घेऊन ड्रॉव्हर उघडले. त्यातील १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे दागिने असलेली पर्स चोरुन नेली. घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.

अनेक घरात गौरी गणपती बसविले जातात. गौरीपूजनाला महिलांना हळदीकुंकवासाठी बोलविण्यात येते. अनेक ठिकाणी गौरी घरात आल्या असताना दरवाजा लावू नये, अशी प्रथा पाळली जाते. दरवाजा लोटून महिला शेजारी पाजारी हळदी कुंकवाला जातात. त्यातून चोरट्यांचे फावते. तेव्हा बाहेर जाताना एक तर घरात कोणीतरी असेल याची काळजी घ्यावी अथवा दोन मिनिटे जरी जायचे असेल तरी कुलूप लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सव