एटीएममधून पैसे काढून देण्याचा बहाणा, इसमाला ४० हजाराला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:37 IST2023-03-15T17:36:20+5:302023-03-15T17:37:09+5:30
crime news : आव्हाड यांच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलिस नाईक चेतन मोरे करत आहेत.

एटीएममधून पैसे काढून देण्याचा बहाणा, इसमाला ४० हजाराला गंडा
- शैलेश कर्पे
सिन्नर (जि. नाशिक) : येथील बस स्थानकासमोर असलेल्या एटीएम मशिनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने भामट्याने एका इसमाला ४० हजारांचा गंडा घातल्याची घटना घडली. दापुर येथील वसंत पांडुरंग आव्हाड (४९) हे आपल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बस स्थानकासमोरील एसबीआयच्या एटीएम मशिनवर आले होते.
एटीएम मधून पैसे काढता येत नसल्याने त्यांना एका भामट्याने मी पैसे काढून देते असे त्यांना सांगितले. आव्हाड यांनी त्या भामट्याला विश्वासाने आपले एटीएम कार्ड देऊन पासवर्डही सांगितला. त्याने काहीतरी हातचालाखी करत एटीएममधून तब्बल ४० हजार रुपये काढून घेतले. मात्र, त्यानंतर भामट्याने तेथून पळ काढला.
आव्हाड यांच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलिस नाईक चेतन मोरे करत आहेत.