उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका नवविवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. सुहागरात्रीच्या दिवशीच पती अशा काही गोष्टी करू लागला की तो नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आले. सुहागरात्रीची स्वप्ने रंगविली होती, परंतू पतीमुळे सगळा विचका झाल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. एवढेच नाही तर नंतर दिराने मग अश्लिल गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तिने केला आहे.
रावतपूरच्या तरुणीचे लग्न गेल्या वर्षी मार्चमध्ये उन्नावच्या बांगरमऊच्या तरुणाशी झाले होते. तिला या वर्षीच्या मार्चमध्ये घरातून हाकलण्यात आले. सासऱ्याने तिच्याकडील सर्व दागिने काढून घेतले आहेत. मोठी जाऊ आणि दिराने मारहाण केली आहे. दिराने शरीरसुख घेण्याचा प्रयत्न केला आहे, असे आरोप तिने केले आहेत.
पहिल्या रात्रीच पतीने माझा मूड घालविला, असा आरोप करत तिने पोलिसांना मोठ्या जावेच्या वागण्याविरोधातही तक्रार लिहून घेण्यास सांगितले. पती नपुंसक असल्याचे तिने दुसऱ्याच दिवशी आपल्या थोरल्या जावेला सांगितले होते. तिने नवविवाहितेला गप्प राहण्यास सांगितले. काही दिवसांनी मोठा दीर आला आणि त्याने नवविवाहितेशी लगट करत, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न सुरु केला. याविरोधात तिने जावेला सांगताच ती जावच तिच्यावर उलटली आणि तिच्यावरच आरोप करू लागली. यात नवविवाहितेला दीर आणि जावेने शिवीगाळ करत मारहाण केली.
यानंतर या नवविवाहितेला त्रास देण्यास सुरुवात झाली. यामुळे कंटाळून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सासरचे लोक तिला घरातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न करत होते, तसेच माहेरहून दोन लाख रुपये मागत होते, असा आरोप तिने केला आहे.