औसा-नागरसोगा रस्त्यावर मजुरांचा भरधाव टेम्पो उलटला, ११ जखमी
By राजकुमार जोंधळे | Updated: October 12, 2022 23:34 IST2022-10-12T23:34:09+5:302022-10-12T23:34:48+5:30
११ पैकी सहा जण गंभीर जखमी, मजुरांना लातूरला रूग्णालयात हलवले

औसा-नागरसोगा रस्त्यावर मजुरांचा भरधाव टेम्पो उलटला, ११ जखमी
औसा (जि. लातूर) : नागरसोगा येथून औशाकडे कोंथिबीर काढण्यासाठी मजुरांना घेवून येणाऱ्या टेम्पाेला समाेरुन दुचाकीला वाचविण्याच्या नादात उलटला. हा अपघात बुधवारी रात्री घडली. या अपघातात ११ मजूर जखमी झाले असून, औशातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सहा गंभीर असलेल्या मजुरांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.
औसा शहरातील विविध भागातील महिला-पुरुष मजुरीसाठी ग्रामीण भागात कोंथिबीर काढण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे नागरसोगा शिवारात कोंथिबीर काढण्यासाठी गेलेज्या मजुराचा टेम्पाे अशाैकडे बुधवारी रात्री परत हाेता. दरम्यान, औसा ते नागरसोगा राज्यमार्गावर कचराकुंडीनजीक अचानक समाेर आलेल्या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न टेम्पाे चालकाने केला. यावेळी भरधाव असलेला टेम्पो उलटला. या अपघातात नाजीया पटेल (वय २५), फरीदा सलिम सय्यद (३५), जुबेदाबी शेख (७०), मशरफबी तस्लिम शेख (३६), फरीदा वाजीद सय्यद (३५), गोराबी जब्बार शेख (६०), मिना अखिल कादरी (६०), अखील बशीर कादरी (७०), आयुब याकुब बागवान (२४), जमीलाबी अब्दुल्ला खान (४०), नादाण बशीर शेख (५०) हे जखमी झाले आहेत.
यातील सहा गंभीर मजुरांना लातूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती औशाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणदिवे यांनी दिली. माजी सभापती मुजाहेद शेख यांनी रुग्णालयात भेट देवून रुग्णांची विचारपूस केली. शिवाय, औशातील युवकांनी वेळीच मदत केल्याने जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करता आले.