शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
2
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
3
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
4
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
5
Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
6
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
7
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
8
धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
9
भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली
10
काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
11
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
12
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
13
Goa Nightclub Fire: शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
14
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
15
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
16
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
17
Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २५ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
18
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
19
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
20
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:37 IST

Crime News : लग्नाच्या १५ व्या दिवशीचं नव्या नवरीनं पतीदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला असा धक्का दिला की, त्यातून सावरणं कुटुंबासाठी कठीण झालं आहे.

राजस्थानच्या सवाई माधोपुरमधील मानटाउन भागातून एका नववधूने केलेल्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांतच या नव्या नवरीने घरातील सगळं सामान घेऊन पळ काढला आहे. मानटाउन परिसरातील आयएचएस कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. या कॉलनीमध्ये राहणाऱ्या विष्णु शर्मा नावाच्या तरुणाने मध्य प्रदेशच्या अनुराधा यादव या तरुणीशी विवाह २० एप्रिल २०२५ रोजी मंदिरात लग्न केले. दोघांचे लग्न पप्पू मीना या मध्यस्थाच्या माध्यमातून झाले होते. या लग्नासाठी वर पक्षाने वधू पक्षाला दोन लाख रुपये देखील देऊ केले होते. दोघांनी लग्नाआधी या संदर्भात कागदोपत्री व्यवहार देखील केला होता. 

लग्नाच्या पहिले दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने गेले. या दरम्यान, अनुराधा ही पती आणि सासरच्या कुटुंबासोबत संसारात रुळली होती. मात्र, लग्नाच्या १४व्या रात्री, ३ मेला तिने संपूर्ण कुटुंबाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर दोन वाजताच्या सुमारास सगळेच बेशुद्धावस्थेत असताना अनुराधाने घरातील ३० हजार रुपयांची रोकड, सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, कानातले, चांदीचे पैंजण आणि एक मोबाईल फोन घेऊन घरातून पळ काढला. अनुराधाने घरातील जवळपास २.५ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. 

नवरदेवाची पोलिसांत धाव पत्नीचे कारनामे लक्षात येताच पती विष्णु शर्मा याने पोलिसांत धाव घेत अनुराधा यादव, मध्यस्थी पप्पू मीना, सुनिता यादव आणि श्याम राजपूत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. विष्णु याच्या कुटुंबाचा भाजी विकण्याचा व्यवसाय आहे. विष्णुने कर्ज काढून लग्न केलं होतं. तर, पत्नी जो मोबाईल घेऊन पसार झाली, तो देखील त्याने मित्राकडून घेतला होता.

आधीच रचला होता कटविष्णु लग्नासाठी मुलीच्या शोधत होता, मात्र त्याला सुयोग्य तरुणी मिळत नव्हती. या दरम्यान त्याची ओळख पप्पू मीनाशी झाली. पप्पूनेच अनुराधा आणि विष्णु यांची भेट घडवून आणली. मुलीचे वडील नसल्याचे कारण देऊन, भेटीच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचे मंदिरात लग्न लावले गेले. यावरून ही योजना आधीच रचली गेली असावी, असा संशय विष्णुने व्यक्त केला. आता पोलीस फरार वधू आणि तिच्या साथीदारांच्या शोधात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानfraudधोकेबाजी