OMG! The largest tax evasion in Europe; 4.3 lakh crore looted in five years | बापरे! युरोपमध्ये सर्वात मोठी कर चोरी; पाच वर्षांत 4.3 लाख कोटी लुटले
बापरे! युरोपमध्ये सर्वात मोठी कर चोरी; पाच वर्षांत 4.3 लाख कोटी लुटले

युरोपच्या इतिहासातील सर्वात मोठी करचोरी पकडण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे याचे सूत्रधार दोघेच असले तरीही वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांच्यासारखे हजारो जण यामध्ये सहभागी आहेत. मात्र, त्यांना याची जराशीही कल्पना न होऊ देता युरोपच्या वेगवेगळ्या देशांमधून तब्बल 60 अब्ज डॉलरची करचोरी करण्यात आली आहे. 


न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. दोन इन्व्हेस्टमेंट बँकर ब्रिटन मार्टिन शील्ड्स आणि किवी पॉल मोरा यांनी युरोपला लुबाडले आहे. दोघेही मेरील लिंच या बँकेत काम करत होते. यावेळी एक मिटींगदरम्यान त्यांची लंडनमध्ये भेट झाली. त्यांनी दोघांनी मिळून एक योजना तयार केली. ज्याचे नाव होते कम एक्स ट्रेडिंग. याचा अर्थ विद ऑर विदाऊट. याद्वारे गुंतवणूकदारांना दुप्पट करापासून वाचविणे हे उद्दीष्ट होते. म्हणजेच गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर कमीतकमी कर लागावा आणि पैसे वाचावेत अशी ही योजना होती. 


हे दोघे एवढे हुशार होते की डिव्हिडेंट टॅक्स पेमेंटवर डबल रिफंड घेत होते. हा सर्व खेळ योग्य वेळ आणि कायद्यातील पळवाटा शोधून चालला होता. यामध्ये या दोघांनी प्राविण्य मिळविले होते. जास्त पैसे वाचत असल्याने ही योजना वेगाने पसरली. या कर चोरीचे सर्वाधिक नुकसान जर्मनीला झाले आहे. या देशाला 30 अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे. यानंतर फ्रान्सला 17 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या देशांमध्ये स्पेन, इटली, बेल्जिअम, नॉर्वे पोलंड आदी देशांचा सहभाग आहे. हा कर घोटाळा 2006 ते 2011 या काळात झालेला आहे. 


याच सारखा आणखी एक घोटाळा उघड झाला होता. दुबईमध्ये राहणाऱ्या ब्रिटीश नागरिक संजय शाह याने डेन्मार्कला 2 अब्ज डॉलरचे नुकसान दिले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. 

Web Title: OMG! The largest tax evasion in Europe; 4.3 lakh crore looted in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.