धक्कादायक! मुलूंडमध्ये वृद्धेची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 21:15 IST2019-09-09T21:14:31+5:302019-09-09T21:15:37+5:30

अज्ञाताने चोरीच्या उद्देशाने त्यांना मारण्यात आल्याची शक्यता

Oldage lady killed in mulund | धक्कादायक! मुलूंडमध्ये वृद्धेची निर्घृण हत्या

धक्कादायक! मुलूंडमध्ये वृद्धेची निर्घृण हत्या

ठळक मुद्दे त्रिवेदी भवनातील रुम नं.११ मध्ये रहात असलेल्या विसारिया यांना रविवारी रात्री साडेआठ ते सोमवारी दुपारी दीड या कालावधीत हत्या केली आहे.ऋषमणी दामजी विसारिया (६७) असे मृत महिलेचे नाव असून या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मुंबई - उपनगरात वृद्धांच्या हत्यांची प्रकरणे पुन्हा घडू लागली आहेत. मुलूंड (प) येथील त्रिवेदी भवन येथे एका वृद्धेची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. ऋषमणी दामजी विसारिया (६७) असे मृत महिलेचे नाव असून या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
अज्ञाताने चोरीच्या उद्देशाने त्यांना मारण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टिने सर्व शक्यता पडताळून तपास करण्यात येत असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले. त्रिवेदी भवनातील रुम नं.११ मध्ये रहात असलेल्या विसारिया यांना रविवारी रात्री साडेआठ ते सोमवारी दुपारी दीड या कालावधीत हत्या केली आहे.

 

Web Title: Oldage lady killed in mulund