From old querrel attacked on a hotel owner with an iron rod | जुन्या वादातून हॉटेलचालकावर लोखंडी रॉडने हल्ला

जुन्या वादातून हॉटेलचालकावर लोखंडी रॉडने हल्ला

ठळक मुद्देअंधेरी परिसरातील चकाला येथे ग्रीटिंग्स नावाचे रेस्टॉरण्ट अँड बार आहे. गुन्हे शाखा कक्ष १० चे पोलीस शिपाई देशपांडे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कलिना येथे लपून बसलेला संतोष तळेकर याला अटक केली.

मुंबई - अंधेरी येथील चकाला परिसरात एका हॉटेलवाल्याने दुसऱ्या हॉटेल चालकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी गुन्हे १० ने एका मारेकऱ्याला अटक केली. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे.
संतोष गजानन तळेकर असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, हल्ल्यात जखमी झालेल्या हॉटेल चालकाचे अंधेरी परिसरातील चकाला येथे ग्रीटिंग्स नावाचे रेस्टॉरण्ट अँड बार आहे. कलिना येथे असलेल्या हॉटेल मालकाशी जखमी झालेल्या हॉटेल चालकाचा जुना वाद होता. त्याच वादातून संतोष तळेकर, राकेश गिरी, अब्दुल, राजा या आरोपींनी गुरुवारी दुपारी अडीच वाजता चकाला येथे जाऊन ग्रीटिंग्स रेस्टॉरण्ट अँड बारमध्ये घुसून मालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी हॉटेल चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यातील आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत होते. गुन्हे शाखा कक्ष १० चे पोलीस शिपाई देशपांडे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कलिना येथे लपून बसलेला संतोष तळेकर याला अटक केली. तर अन्य फरार तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: From old querrel attacked on a hotel owner with an iron rod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.