यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:59 PM2021-07-22T15:59:58+5:302021-07-22T16:01:16+5:30

गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली.

An Old Man dies in crane dash at Darwha yavatmal | यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू

Next


यवतमाळ : दारव्हा येथे क्रेनची धडक बसल्याने एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरवारी दुपारी १ वाजता आर्णी मार्गावर घडली. प्रल्हाद डोमे (६०) रा .टाळळी (बु.) असे मृताचे नाव आहे. जनावरांचा चारा विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.

नेहमीप्रमाणे गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू  झाला. रस्त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची या मार्गावरून वाहतूक केली जाते.

दिवसभर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात झाला. खड्ड्यांमुळे एका व्यक्तीला आपला जिव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

Web Title: An Old Man dies in crane dash at Darwha yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.