पँटमध्ये लपवून तेल बाटल्यांची चोरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:04 IST2019-03-01T01:04:47+5:302019-03-01T01:04:56+5:30

मालाडमधील प्रकार : रिक्षाचालकाला अटक

Oil bottles stealthily hidden in the pants! | पँटमध्ये लपवून तेल बाटल्यांची चोरी !

पँटमध्ये लपवून तेल बाटल्यांची चोरी !

- गौरी टेंबकर - कलगुटकर


मुंबई : पँटमध्ये खाऊ आणि मसाज तेलाच्या बाटल्या लपवून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिक्षाचालकाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार मालाड पश्चिमेच्या डी मार्टमध्ये घडला़ ही चोरी करण्याची त्याची तिसरी वेळ असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


जुनैद चारोलीया (४०) असे अटक रिक्षाचालकाचे नाव आहे़ तो जोगेश्वरीचा राहणारा आहे. चारोलिया रविवारी मालाडच्या लिंक रोड परिसरात असलेल्या डी मार्टमध्ये खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरला आणि त्याने काही सामान बास्केटमध्ये टाकले. त्यांनतर निर्मनुष्य जागी जात त्याने या वस्तू त्याच्या पँटमध्ये लपवून, बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मार्टच्या सुरक्षारक्षकांनी अडविले. त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे मालीश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महागड्या तेलाच्या बाटल्या आणि खाण्याचे पदार्थ सापडले.


चारोलीया याने केलेला हा पहिला प्रकार नाही़ यापूर्वी एक दोनदा त्याने अशाच प्रकारे सामानाची चोरी करून पळ काढला होता.
आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे तेल आणि अन्न खाण्याची त्याला सवय होती. अजून त्याने अशा प्रकारे कुठे चोरी केली आहे का? याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Web Title: Oil bottles stealthily hidden in the pants!

टॅग्स :theftचोरी