शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! गेली १४ वर्ष मुख्याध्यापक करत होता विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, म्हणून गावकऱ्यांनी ठेवले तोंड बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 20:45 IST

Sexual Abuse Case : १५ फेब्रुवारीला तीन विद्यार्थिनींचे १९८ फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ५४ वर्षीय मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली.

अरे देवा! गेली १४ वर्ष मुख्याध्यापक करत होता विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, म्हणून गावकऱ्यांनी ठेवले तोंड बंद 

एका मुख्यध्यापक आणि शाळेच्या मालकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आणि ते पळून गेल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील नांगलमध्ये उघडकीस आली. गेली १४ वर्ष हा नराधम मुख्याध्यापक लैंगिक अत्याचार करत होता. अजून धक्कादायक बाब म्हणजे पीडित आणि गावकरी यांनी लज्जेखातर आणि मुख्यध्यापकावर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे त्यांनी हे प्रकरण लपवून ठेवले. १५ फेब्रुवारीला तीन विद्यार्थिनींचे १९८ फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या ५४ वर्षीय मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. महत्वाचे म्हणजे ही शाळा पंजाब राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असून शाळेला सरकारी निधी मिळतो.

आता हे प्रकरण उजेडात आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. मुख्याध्यापकाने हे फोटो आपल्या संगणकावरून काढल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणाबाबत आता एक माजी विद्यार्थी मुख्याध्यापकाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी पुढे आला आहे. पंजाब विधानसभेचे आउटगोइंग स्पीकर आणि आनंदपूर साहिब येथून तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे आमदार राणा के पी सिंग यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा मुख्याध्यापकाने केला होता. मात्र,त्यांनी या मुख्याध्यापकाशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले स्पष्ट करत चौकशीची मागणी केली आहे. राणा म्हणाले, मुख्याध्यापकावर आरोप घेऊन कोणत्याही गावकऱ्याने माझ्याकडे कधीही संपर्क साधला नाही. पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आणि मला आशा आहे की त्याला आता शिक्षा मिळेल.

पंचायत सदस्याच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याचे आम्हाला समजले, परंतु आमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र विद्यार्थींही कधीही तक्रार केली नाही. पीडित आणि गावकरी यांनी लाजेखातर आणि त्यांच्यावर असलेल्या राजकीय प्रभावाच्या भीतीपोटी हे प्रकरण लपवून ठेवले होते. मात्र, आता आरोपी मुख्यध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसSchoolशाळाArrestअटकStudentविद्यार्थी