मामीच्या भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 17:58 IST2019-09-06T17:58:08+5:302019-09-06T17:58:38+5:30
पीडित अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिला फूस लावली.

मामीच्या भावाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
हिंजवडी : अल्पवयीन आहे हे माहिती असूनसुद्धा मामीच्या भावाने वेळोवेळी जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तिच्यासह कुटुंबियाची बदनामी करण्याची धमकी दिली. ही घटना थेरगाव येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार २५ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडित तरुणीच्या मामीचा भाऊ आहे. पीडित अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिला फूस लावली. पीडितेच्या मामीच्या थेरगाव येथील घरी येऊन जाऊन तीन वर्षांपासून आरोपीने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून तिच्यासह कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.