शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान, शरजिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:10 IST

Sharjeel Usmani News : एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - नुकत्याच पुण्यात आयोजित झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.३० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी याला भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक विधाने केली होती. शरजिल उस्मानी याने एल्गार परिषदेत ''हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरिके से सड़ चुका है'' आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ''मी भारतीय संघराज्य मानत नाही'', अशी प्रक्षोभक विधाने केली होती. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला होता.या प्रकरणी उस्मानी याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली होती. शरजिल उस्मानी याच्यावर  गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा अर्ज आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिला आहे. त्यांनी चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करीत राहाणार असल्याचे अँड प्रदीप गावडे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना सांगितले होते.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी