शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:45 AM2022-05-15T05:45:33+5:302022-05-15T05:46:07+5:30

केतकीवर कळंबोली ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शाई व अंड्यांचा मारा केला.

offensive post on ncp chief sharad pawar actress ketki chitale arrested | शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे अटकेत

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे/मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांविरूद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर केलेली कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी तिला नवी मुंबईतील कळंबोली येथून ठाणे क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई केल्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी लोकमतला सांगितले.

केतकीवर कळंबोली ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शाई व अंड्यांचा मारा केला. नाशिकमध्ये पवार यांच्याविषयी बनावट अकाउंट उघडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे (२२) याला अटक केली. 

वादग्रस्त पोस्टमुळे केतकी यापूर्वीही चर्चेत आली. यावेळी तिने शरद पवारांना लक्ष्य केले. ॲड. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने केलेली हीन कविता तिने फेसबुकवर पोस्ट केली. लागलीच तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही केतकीला खरमरीत शब्दात सुनावले आहे.
 

Web Title: offensive post on ncp chief sharad pawar actress ketki chitale arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.