Offense against unknown person for violating code of conduct | आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा

नालासोपारा - वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या गाडी क्रमांक एमएच-48 ए-1169 या गाडीवर शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा फोटो व चिन्ह असलेले स्टिकर लावून प्रचाराकरीता शासकीय वाहनाचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 अन्वये 26 एप्रिल रोजी अज्ञात व्यक्तीविरूद्ध आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबाबत हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती समन्वय अधिकारी, आदर्श आचारसंहिता कक्ष यांच्यामार्फत देण्यात आली आहे.


Web Title: Offense against unknown person for violating code of conduct
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.