Naba Das Died: ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांचे निधन; नब दास यांना पाच गोळ्या लागलेल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 20:16 IST2023-01-29T20:12:43+5:302023-01-29T20:16:12+5:30
ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामुळे नब दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती ...

Naba Das Died: ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांचे निधन; नब दास यांना पाच गोळ्या लागलेल्या
ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामुळे नब दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. सायंकाळी त्यांचे निधन झाले.
झारसुगुड़ा जिल्ह्यातील बृजराजनगरमध्ये हा हल्ला झाला होता. ते तिथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. नब दास त्यांच्या कारमधून उतरत होते, तेवढ्यात तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या एएसआयने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या छातीला लागल्या होत्या.
दास यांना एअरलिफ्ट करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, गांधी चौक पोलीस ठाण्याचा अधिकारी एएसआय गोपाल दास यांने नबा दास यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या.
'गोपाल अगोदर बरा होता, पण काही दिवसापासून त्याची मनस्थिती ठिक नव्हती. यासाठी औषध घेत होता. तो ७/८ वर्षांपासून औषध घेत होता. त्याला आता सगळं नॉर्मल होतं, असं पत्नीने सांगितले. यावरुन आरोपीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे समोर आले आहे.