अनैतिक संबंधात अडसर; पत्नीने काढला पतीचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 09:17 IST2024-03-02T09:17:16+5:302024-03-02T09:17:29+5:30

घटनास्थळावरून दोन व्यक्ती पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसले.

Obstacles to immoral relationships; The wife removed the husband's fork | अनैतिक संबंधात अडसर; पत्नीने काढला पतीचा काटा

अनैतिक संबंधात अडसर; पत्नीने काढला पतीचा काटा

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडांना सुपारी देऊन  भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि  सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंड अशा चार जणांना अटक केली आहे.

मृत रमेश झा (वय ४८) हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ एमआयडीसीत एका कंपनीत कामगार होते. ते सर्वोदयनगर परिसरात संशयित आरोपी सुमन आणि दोन मुलांसह राहत होते. २५ फेब्रुवारीला रात्री त्यांची एका ढाब्यासमोर भररस्त्यात दोन अनोळखी मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार २६ फेब्रुवारीला रमेश यांच्या मुलाने दिली. 

घटनास्थळावरून दोन व्यक्ती पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसले. दोन्ही मारेकरी रिक्षात बसून जाताना दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी दिल्लीला पळून जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी हत्येची कबुली दिली.

दहा वर्षांपासून दिल्लीत वास्तव्य
रमेश यांची बायको दहा वर्षांपासून दिल्लीत राहत असताना तिचे धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर २०२२ मध्ये सुमन दिल्लीतील प्रियकराला सोडून अंबरनाथमध्ये पतीकडे राहण्यास आली. मात्र, पती  अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने सुमन, धर्मवीर या दोघांनी रमेश यांची हत्या करण्याचा कट रचून दिल्लीतील दोन गुंडांना सुपारी दिली.

Web Title: Obstacles to immoral relationships; The wife removed the husband's fork