शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
7
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
8
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
9
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
10
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
12
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
13
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
14
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
15
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
16
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
17
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
18
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
20
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन; आरोपीला पाच वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 10:28 IST

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू याने १ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ३ वाजता एका मुलाला पीडितेकडे पाठविले होते. त्याने ‘तुला पिंटू मामाने बोलावले’ असे सांगून पीडितेला पिंटूच्या घरी आणले. त्यानंतर पिंटूने स्वत:च्या मुलीला या मुलासोबत बाहेर दुकानावर चॉकलेट खायला पाठविले.

जळगाव : दहा वर्षाच्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू धुडकू खंबायत (रा.आसोदा, ता.जि.जळगाव) याला न्यायालयाने दोषी धरून पाच वर्षे सश्रम कारावास, तीन कलमात ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची निम्मे रक्कम तसेच शासनाने एक लाख रुपये पीडितेस देण्याचे आदेश देण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. माने (गाडेकर) यांनी बुधवारी हा निकाल दिला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू याने १ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी ३ वाजता एका मुलाला पीडितेकडे पाठविले होते. त्याने ‘तुला पिंटू मामाने बोलावले’ असे सांगून पीडितेला पिंटूच्या घरी आणले. त्यानंतर पिंटूने स्वत:च्या मुलीला या मुलासोबत बाहेर दुकानावर चॉकलेट खायला पाठविले. त्यानंतर पीडितेला मिरच्या चिरायचे सांगून पाच रुपये देऊ केले. मात्र तिने त्यास नकार दिला. त्यानंतर पीडितेशी पिंटूने अश्लील वर्तन केले. घाबरलेल्या मुलीने मामा मला सोड, अशी जोरात ओरडली व हिसका देऊन घराबाहेर धावत गेली. गल्लीत एका महिलेला तिने हा प्रकार सांगितला. सायंकाळी आई घरी आल्यावर पीडिता व या महिलेने घटनेची माहिती दिली. पीडितेच्या आईने तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

सात साक्षीदारांची तपासणीअतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. माने (गाडेकर) यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारी वकील अनुराधा वाणी यांनी सरकारतर्फे सात साक्षीदार तपासले. त्यात पीडिता, तिची आई, शेजारची महिला, पीडितेचा जबाब नोंदवून घेणाऱ्या महिला पोलीस अधिकारी सुप्रिया देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. कलम ३५४ अ नुसार ३ वर्षे कारावास, १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, पोक्सोचे कलम ७ व ८ नुसार ३ वर्षे कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास व पोक्सो कलम ९ (एम) (पी) अंतर्गत ५ वर्षे कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास यासह दंडाची निम्मे रक्कम पीडितेला देण्यासह शासनानेदेखील एक लाख रुपये पीडितेला द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी