तळेगाव दाभाडे : जबरदस्तीने घरात घुसून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी तरुणावर विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथे रविवारी (दि. ७) सकाळी ही घटना घडली.याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोन्या उर्फ सोमनाथ रघुजी काळे (वय ३३, रा. नाणोली, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुणे येथील जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रविवारी सकाळी फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या नातीसोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. घटनेनंतर फिर्यादी यांनी हा प्रकार त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर सोमवारी (दि. ८) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन; विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 00:31 IST
आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केले..
अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन; विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
ठळक मुद्देयाप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण येथे रविवारी घडली घटना