Objectionable message on whats app put youth in trouble in goa | व्हॉट्स अ‍ॅपवरून आक्षेपार्ह मेसेज करणं पडलं महागात 
व्हॉट्स अ‍ॅपवरून आक्षेपार्ह मेसेज करणं पडलं महागात 

ठळक मुद्देकुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश नाईक हे पुढील तपास करीत आहेत.पीडित महिलेने यासंबधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

मडगाव - व्हॉट्स अ‍ॅपवरुन आक्षेपार्ह मेसेज पाठवून देणे किती महागात पडतं. याचा प्रत्यय गोव्यात एका इसमाला आला आहे. एका महिलेला सोशल मिडियावरुन अर्वाच्य भाषेत संदेश पाठविल्याबद्दल एकावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील कुंकळळी येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला आहे. रॉनी रिबेलो असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने यासंबधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भारतीय दंड संहिता कलम  509 अन्वये संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश नाईक हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Objectionable message on whats app put youth in trouble in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.