नग्न मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाला घेतला चावा अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 21:59 IST2020-02-12T21:57:18+5:302020-02-12T21:59:35+5:30
उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली.

नग्न मनोरुग्णाने पोलिसाच्या बोटाला घेतला चावा अन्...
मुंबई - नागपाडा जंक्शन परिसरात नागपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलच्या डाव्या हाताच्या बोटाचा एका नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने चावा घेतला. चावा घेतल्याने पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला. या जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव जनार्दन साखरे असं आहे.
पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन साखरे हे गस्तीवर असताना नागपाडा जंक्शननजीक शफिक अहमद सुलेमान (४५) नावाचा मनोरुग्ण नग्न अवस्थेत गोंधळ घालत होता. त्यावेळी जमलेल्या जमावाने उपस्थित पोलिसांना मदत करण्यासाठी पाचारण केले. त्यानंतर जनार्दन साखरे हे मदतीसाठी गेले असता मनोरुग्णाने साखरे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटाचा चावा घेतला. पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला. त्याला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली. सुलेमान हा मनोरुग्ण असून तो पूर्वी ठाण्यात राहत होता. आता तो वडाळ्यात राहत असल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती शर्मा यांनी दिली.