अरे बापरे! आता पालिका शौचालयांत सुरु झाले जुगाराचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 23:00 IST2020-04-14T22:58:25+5:302020-04-14T23:00:13+5:30

भाईंदरच्या गणेश देवल नगरमधील पालिका शौचालयांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पत्ते जुगाराचे व्हिडिओ समोर आले आहेत.

Now the municipality has started gambling in the toilets pda | अरे बापरे! आता पालिका शौचालयांत सुरु झाले जुगाराचा अड्डा

अरे बापरे! आता पालिका शौचालयांत सुरु झाले जुगाराचा अड्डा

ठळक मुद्दे ही टोळकी या शौचालयाच्या पेजेसमध्येच तळ ठोकून असतात. पेणकरपाड्यातील पालिका शौचालयात एका मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता.

मीरारोड - महापालिकेने लोकांच्या सुविधेच्या नावाखाली बांधलेली सार्वजनिक शौचालये चक्क जुगारायांचा अड्डा बनली आहेत. भाईंदरच्या गणेश देवल नगरमधील पालिका शौचालयांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पत्ते जुगाराचे व्हिडिओ समोर आले आहेत.

कोरोनामुळे लोकांना घरा बाहेर पडण्यास मनाई केली आहे. झोपडपट्टी भागात तर मनाई आदेश धुडकावणारी लोकं पाहून पोलीसांनी देखील गस्त वाढवली आहे. परंतु महापालिकेने मात्र त्यांच्या स्वत:च्या सार्वजनिक शौचालयांना वाऱ्यावर सोडले असल्याने गणेश देवल नगरमधील पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा ताबा परिसरातील काही टपोरी उनाडांनी घेतलेला आहे. ही टोळकी या शौचालयाच्या पेजेसमध्येच तळ ठोकून असतात. तेथे पत्त्यांचा जुगार खेळण्यापासून शिवीगाळ आदी प्रकार सर्रास सुरु आहेत.

वास्तविक महापालिकेने ठेकेदारांचे चांगभलं करण्यासाठी अवास्तव आणि वस्ती नसणाऱ्या ठिकाणी शौचालयं बांधली आहेत. अनेक शौचालयं वापरावीना बंदच आहेत. झोपडपट्टीच्या नावाखाली चक्क गृहसंकुलातील आरजीच्या भुखंडांवर सुध्दा शौचालये बांधली आहेत. शिवाय खाडी पात्र परिसर, कांदळवनात तसेच मीठ विभागाच्या जागेत पर्यावरणाचा ऱ्हास करुन पालिकेने शौचालये बांधलेली आहेत. काही प्रकरणात पालिका अधिकारी - ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पेणकरपाड्यातील पालिका शौचालयात एका मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता. त्यातच आता पालिकेची शौचालये जुगारायांचा अड्डा बनल्याने पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.  

Web Title: Now the municipality has started gambling in the toilets pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.