शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 21:23 IST

Cyber Crime : ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टेलिग्राम वाहिनीने हिंदू महिलांना लक्ष्य केले आहे. आता अश्लील फोटोंच्या माध्यमातून हिंदू महिलांना लक्ष्य केल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलीस आता याप्रकरणी अधिकृत तक्रारीची वाट पाहत आहेत. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर नोंदवता येईल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.ते म्हणाले की, टेलिग्राम वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. संपूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. वास्तविक, गेल्या वर्षी जूनपासून टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया अॅप्स आणि चॅनेलवर अश्लील गोष्टी पोस्ट केल्या जात होत्या. याप्रकरणी अंशुल सक्सेना नावाच्या युजरने मुंबई पोलिसांना टॅग करत एक टेलिग्राम चॅनल हिंदू महिलांना टार्गेट करत असल्याचे लिहिले आहे. हे टेलिग्राम चॅनल जून २०२१ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यांचे हे ट्विट ट्विट करताना मीरा मोहंती नावाच्या युजरने आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केले. त्यानंतर मंत्री महोदयांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. ३१ डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.  उत्तराखंडमधून श्वेता सिंगसह उत्तराखंडमधील आणखीन एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामागे नेमके कोण आहे याचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीITमाहिती तंत्रज्ञानPoliceपोलिसdelhiदिल्लीTwitterट्विटरHinduहिंदू