मुंबईत एटीएसकडून कुख्यात नक्षली जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 08:10 IST2022-09-19T08:09:32+5:302022-09-19T08:10:03+5:30

रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत यादव हा औषधोपचाराकरिता येणार असल्याची माहिती मिळाली.

Notorious Naxalites jailed by ATS in Mumbai | मुंबईत एटीएसकडून कुख्यात नक्षली जेरबंद

मुंबईत एटीएसकडून कुख्यात नक्षली जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य कारू हुलाश यादव (४५) याला  राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर  १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत यादव हा औषधोपचाराकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून यादवला ताब्यात घेतले. यादव हा मूळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्य आहे. तो सन २००४ पासून नक्षली कारवायांत सक्रिय होता. त्याच्यावर १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. आरोपीबाबत झारखंड पोलिसांना माहिती देण्यात आली असून, त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे एटीएसने सांगितले.

Web Title: Notorious Naxalites jailed by ATS in Mumbai