शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड सुरेश पुजारीला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 21:40 IST

Notorious goon Suresh Pujari remanded :सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून ताब्यात घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं भारतात आणलं असून सुरेश पुजारीवर मुंबई आणि कर्नाटकामध्ये खंडणी वसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

मुंबई - कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील विशेष MCOCA कोर्टाचे निर्देश दिले आहेत. सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून ताब्यात घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA)  भारतात आणलं असून सुरेश पुजारीवर मुंबई आणि कर्नाटकामध्ये खंडणी वसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 

राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) चौकशीनंतर गँगस्टर सुरेश पुजारीचा गुन्हे शाखेने ताबा घेतला आहे. शुक्रवारी त्याला प्रॉडक्शन वाॅरंटवरून ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला  २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मुंबईत त्याच्याविरोधात १७ गुन्हे नोंद असून त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.पुजारीविरोधात मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि कर्नाटक या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. फिलिपिन्समध्ये प्रेयसीसोबत बनावट नावाने राहणाऱ्या सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबर २०२१ राेजी तेथील पोलिसांनी अटक केली होती.  पुढे एटीएसच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला आहे. शुक्रवारी त्याला अटक करीत, न्यायालयात हजर केले.उल्हासनगर परिसरात कुटुंबासोबत राहण्यास असलेल्या व्यावसायिकाचे फोर्ट परिसरात कॅमेऱ्याचे दुकान आहे. त्याच्या व्यवसायावर नजर पडलेल्या सुरेश पुजारी टोळीने ६ जानेवारी २०१८ पासून ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान अशा प्रकारेच खंडणी न देणाऱ्या ठाण्याच्या भिवंडी परिसरातील हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलवर १० जानेवारीला दुपारी चारच्या सुमारास पुजारीने तीन शूटर्सच्या मदतीने गोळीबार घडवून आणला. त्यानंतर पुजारीने फोर्टमधील व्यावसायिकाला अशा प्रकारेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी सुरू केली हाेती. खंडणीच्या तक्रारीच्या आधारे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सहाजणांना अटक केली. मोक्काअन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये पुजारी पाहिजे असलेला आरोपी होता. त्यानुसार गुन्हे शाखेने प्रॉडक्शन वाॅरंटवरून ताब्यात घेत त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदाPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाAnti Terrorist SquadएटीएसCourtन्यायालय