शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नागपुरातील कुख्यात गुंड बंटी ठवरे जेरबंद : दोन पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:47 AM

शहरातील खतरनाक गुन्हेगार बंटी ऊर्फ राजू ठवरे याच्या आज पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ही सिनेस्टाईल कामगिरी बजावली.

ठळक मुद्देपडक्या घरात लपून होता , गुन्हे शाखेच्या युनिट चारची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील खतरनाक गुन्हेगार बंटी ऊर्फ राजू ठवरे याच्या आज पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ही सिनेस्टाईल कामगिरी बजावली.कुख्यात गुन्हेगार बंटी ऊर्फ राजू ठवरे याच्याविरुद्ध खुनाच्या दोन गुन्ह्यांसह एकूण ५७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचे साथीदार आकाश गुंडलवार तसेच बदल सहारे या दोघांसह नंदा वानखेडे नामक महिलेच्या घरावर हल्ला केला होता. तिला पिस्तूल लावून येथे राहायचे असेल तर दरमहा ५ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यापासून बंटी फरार होता. तो मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पीएसआय नागोराव इंगळे यांना कळाली. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना सांगितले. त्यावरून मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास प्रजापती चौकाकडे धाव घेतली. जंक्शन बारच्या बाजूला एक पडकी इमारत आहे. तेथे तो दडून असल्याची माहिती कळताच इमारतीला पोलिसांनी गराडा घातला. त्यानंतर बंटी दिसताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि मोबाईल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी सहआयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय दिलीप चंदन, सहायक फौजदार नागोराव इंगळे, नायक प्रशांत कोडापे,नितीन अकोटे, सचिन तुमसरे आणि दीपक खाडे यांनी ही कामगिरी बजावली.आणखी दोन पिस्तूल जप्तगुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हसनबाग मधील कुख्यात गुंड शेख शाहरुख सय्यद अक्रम याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपी शाहरूखविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून तो लकडगंजमधील ७५ लाखाच्या बहुचर्चित दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.बल्लूही पिस्तूलासह सापडलागुन्हे शाखेच्या चेन स्रॅचिंग पथकानेही कुख्यात गुंड समीर अली ऊर्फ बल्लू याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून इम्पोर्टेड वाटणारे एक पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त केले. पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक