शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड भेटायला आला अन् कुख्यात गँगस्टर NCB च्या जाळ्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 22:23 IST

Drugs Case : सोनू पठाण हा मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा प्रमुख म्होरक्या आहे.

ठळक मुद्देपायधुनी येथूल मोहम्मद जमान हिदायतुल्लाह खान उर्फ सोनूला काल रात्री १ वाजताच्या सुमारास बेड्या ठोकल्या.

मुंबईमुंबईतील कुख्यात गँगस्टर सोनू पठाणला अटक करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पथकाने  पायधुनी येथूल मोहम्मद जमान हिदायतुल्लाह खान उर्फ सोनूला काल रात्री १ वाजताच्या सुमारास बेड्या ठोकल्या. गर्लफ्रेंडला भेटायला आला असताना सोनू एनसीबीच्या जाळ्यात अडकला. सोनू पठाण हा मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा प्रमुख म्होरक्या आहे. 

गँगस्टर सोनू पठाणच्या विरोधात १० गुन्हे दाखल आहेत. यापैकी ७ गुन्हे मुंबई पोलिसात तर ३ गुन्हे एनसीबीमध्ये दाखल आहेत. सोनू हा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता. सोनू मध्यरात्री आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला येणार असल्याची गुप्त माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सापळा लावून सोनू पठाण याला जेरबंद केले.

NCB च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना चिंकू पठाण उर्फ परवेज खान याच्याशी संबंधित होता. त्यावेळी चिंकू पठाण याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सोनू पठाण याचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर काल मध्यरात्री १ वाजता पायधुनी येथून अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.एनसीबीने दाऊद इब्राहिमचा खास परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांना अटक केली होती. चिंकू पठाणच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने माहीम येथे छापा टाकला होता. 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईArrestअटक