कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधींचा प्लॉट हडपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 08:58 PM2020-01-29T20:58:44+5:302020-01-29T21:00:21+5:30

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळवून हप्ता वसुली केली आहे. पीडित व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे.

Notorious accused Santosh Ambkar grabbed billions of plots on gunshot | कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधींचा प्लॉट हडपला

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधींचा प्लॉट हडपला

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्याची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या धाकावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळवून हप्ता वसुली केली आहे. पीडित व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे.
संजय रहाटे रा. बजरंगनगर, मानेवाडा यांचा इतवारीत आंबेकरच्या घराजवळ प्लॉट होता. आंबेकर जमीन हडपण्याच्या कामात पटाईत आहे. त्याची रहाटे यांच्या जमिनीवर नजर केली. आंबेकरने रहाटेवर प्लॉट विकण्यासाठी दबाव टाकला. तो तयार न झाल्यामुळे त्याने रहाटेला कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात येण्यास भाग पाडले. आंबेकरने बहुतांश प्रॉपर्टी आपल्या साथीदारांच्या नावाने खरेदी केली आहे. त्याने रहाटेचा प्लॉट नवाबपुरा येथील रहिवासी नीतेश पुरुषोत्तम माने याच्या नावावर खरेदी केला. नीतेश आंबेकरचा नातेवाईकही आहे. त्याने रहाटेला धमकी देऊन रजिस्ट्रीच्या कागदपत्रावर सही करण्यास सांगितले. हा सौदा ५५ लाख रुपयात करण्यात आला. नीतेशने रहाटेला रजिस्ट्रीच्या वेळी ५ लाख रुपयांचा चेक दिला. उर्वरीत ५० लाख रुपये आंबेकरच्या घरी देण्याचे आश्वासन दिले. रहाटे उर्वरीत ५० लाख रुपये घेण्यासाठी आंबेकरच्या घरी पोहोचला. आंबेकरने रुपये देण्याऐवजी रहाटेच्या कानाला बंदुक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. रहाटेकडून रोख किंवा चेकच्या रुपाने ५ लाख रुपये देण्यास सांगितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन प्लॉटवर ताबा मिळविला. एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे प्रकरण सुरु होते. आंबेकरची दहशत आणि अनेक कमकुवत नागरिकांच्या संपत्तीवर त्याने ताबा मिळविल्यामुळे घाबरून रहाटे याने तक्रार दाखल केली नाही. गुन्हे शाखेने आंबेकर टोळीची पाळेमुळे उद्ध्वस्त केल्यामुळे रहाटेने याची तक्रार केली. रहाटेच्या प्लॉटची किंमत २ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आंबेकर टोळीविरुद्ध आतापर्यंत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यात बलात्कार, फसवणूक, जमिनीचा ताबा मिळविणे, खंडणी मागणे, धमकी देणे आदींचा समावेश आहे. या प्रकरणात आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश आणि शैलेशसह १२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत. या प्रकरणात तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. यात अकोलाचा कृष्णा सोटंगे, राजेश यादव, मुंबईचा जगन जगदाळे यांचा समावेश आहे.
पोलिसांनी तिघांना फरार घोषित करून त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. समर्पण न केल्यास पोलीस तिघांची संपत्ती जप्त करणार आहेत. कृष्णा सोटंगे आंबेकरचा जवळचा आहे. आंबेकरने गुन्हेगारीच्या माध्यमातून गोळा केलेल्या कमाईचा मोठा वाटा कृष्णाजवळ आहे. त्याने अनेक बांधकाम योजनात गुंतवणूक केली आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो भूमिगत झाला आहे. पोलिसांनी केवळ पाच प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पकडल्यानंतर इतर प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. आंबेकर टोळीविरुद्ध फसवणूक तसेच वसुलीच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. धमकी देऊन जमिनीचा ताबा घेणे ही त्याची दुसरी पद्धत आहे. या पद्धतीने त्याने बरीच संपत्ती गोळा केली आहे. त्या आधारावर आंबेकर टोळी विरुद्ध मकोकाची कारवाई केली जाऊ शकते.

मदत करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
दोन दशकांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय असूनही आंबेकरला कोणतीच शिक्षा झाली नाही. या दिशेने तपास केला असता पोलिसांना आंबेकरजवळ वकील, दलाल, अधिकारी, नेता आणि माध्यमात त्याचे संबंध असल्याची माहिती मिळाली. या लोकांच्या मदतीने तो साक्षीदार आणि पीडितांना धमकी देऊन आपला धाक दाखवित होता. त्यानंतर तो अनेक मोठ्या प्रकरणातून सहज बाहेर पडत होता. पोलीस तपासात अशा व्यक्तींची नावे उजेडात आली आहेत. आंबेकरला त्यांनी बरीच मदत केली आहे. त्या मोबदल्यात त्यांना आंबेकरने पैसेही दिले आहेत. पोलीस त्यांना धडा शिकविण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे. यापैकीच एका मोठ्या पदावरील व्यक्तीची काही दिवसांपूर्वी बदली झाली आहे.

Web Title: Notorious accused Santosh Ambkar grabbed billions of plots on gunshot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.