शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडने कारणे दाखवा नोटीस

By पूनम अपराज | Updated: August 7, 2018 21:35 IST

संदीप अवस्थी यांनी याबाबत कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे. 

मुंबई - भारत सरकारच्या पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या बनावट लेटर हेडच्या मदतीने विविध ट्रेनिंग अॅकॅडमींना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट लेटर  हेडचा आणि त्यावरील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या स्वाक्षरीचा वापर करुन सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला आहे. वेळीच हे प्रकरण लक्षात आल्यानंतर शिपींग कार्पोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या संदीप अवस्थी यांनी याबाबत कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तपाले यांनी दिली. 

कांजूरमार्ग परिसरात राहणारे संदीप अवस्थी हे शिपींग काॅर्पोरेशनमध्ये नोकरी करतात. २० जुलैपासून भारत सरकारच्या पोर्ट परिवहन मंत्रालयातर्फे डेहरादुनच्या अॅकॅडमी ऑफ इंटरनॅशनल मेरिटाईम ट्रेनिंग या इन्स्टिट्यूटमध्ये चुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. भारत सरकारच्या पोर्ट परिवहन मंत्रालयाच्या लेटर हेडद्वारे संबधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली करणे दाखवा नोटीस  अॅकॅडमी ऑफ इंटरनॅशनल मेरिटाईम ट्रेनिंग, 646 पटेल नगर डेहरादुन यांना बजावण्यात आली होती. या घटनेनंतर शिपींग काॅर्पोरेशनमध्ये एकच खळबळ उडाली.

मात्र, बनावट लेटर हेडचा वापर करून ही नोटीस बजावण्यात आल्याचा प्रकार शिपींग कार्पोरेशनमध्ये कार्यरत असलेल्या संदीप अवस्थी यांच्या निदर्शनास आला. या बनावट लेटर हॅड आणि स्वाक्षरीचा वापर करून अनेकांना अशा प्रकारे खोट्या बदनामीकारक नोटीसा पाठवत भारत सरकार पोर्ट परिवहन मंत्रालयाची बदनामी करण्यात आल्याने संदीप अवस्थी यांनी ई-मेलद्वारे  वेळीच खबरदारी घेऊन परिमंडळ -७ कडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार कांजूरमार्ग पोलिसांनी भा. दं. वि.  कलम ४६५,४६९,४७१,५००,५०१ सह कलम ६६(क) माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMantralayaमंत्रालयfraudधोकेबाजीPoliceपोलिस