शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Me Too प्रकरणी नानाला अद्याप क्लीन चिट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 16:46 IST

ओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली आहे.अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी  Me Too  मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दाखल केलेली तक्रार म्हणजेच  Me Too   प्रकरणी क्लीन चीट मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, नाना पाटेकर यांना याप्रकरणी अद्यापही क्लीन चीट मिळालेली नाही, असा खुलासा बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता यांचे वकील नितीन सातपुते यांनी केला आहे. यासंदर्भात ओशिवरा पोलिसांनी देखील नाना पाटेकर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी  Me Too  मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. त्यानंतर ती परदेशात वास्तव्यास गेली होती. गेल्या वर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तीने Me Too  मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाची दखल घेऊन ओशिवरा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपासून याप्रकरणी नाना पाटेकर यांना क्लीन चीट मिळाल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर सुरु होती. यावर तनुश्री दत्ताने एक स्टेटमेण्ट जारी केली आहे. तसेच तिचे वकील नितीन सातपुते यांनी खुलासा करत व्हायरल झालेली माहिती खोटी असल्याचा दावा केला आहे. तनुश्रीच्या स्टेटमेण्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिल्याची बातमी फिरत आहे. परंतु, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.  Me Too  चळवळीनंतर नाना पाटेकर यांना कोणतेही काम मिळत नसल्याने त्यांची टीम अशाप्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगTanushree Duttaतनुश्री दत्ताPoliceपोलिसNana Patekarनाना पाटेकर