Spa Center Caught Fire: नोएडा: स्पा सेंटरला लागली आग; महिलेसह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 21:54 IST2022-02-17T21:54:11+5:302022-02-17T21:54:24+5:30
Spa Center Caught Fire: आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी सुरु केली.

Spa Center Caught Fire: नोएडा: स्पा सेंटरला लागली आग; महिलेसह दोघांचा मृत्यू
नोएडाच्या सेक्टर २४ मधील एका स्पा सेंटरमध्ये भीषण आग लागली. यामध्ये महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे नोएडामध्ये खळबळ उडाली आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी सुरु केली. स्पा सेंटरमध्ये आग लागल्याचे कळताच तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी आल्या आणि आग विझविली.
नोएडा सेक्टर २४ च्या पोलीस ठाणे हद्दीत हे स्पा सेंटर होते. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी सांगितले की, दोघांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.