शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

आर्यन खानजवळ ड्रग्ज सापडले नाही; चॅट रॅकेटमधील सहभाग दर्शवत नसल्याचा वकिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 5:39 PM

Aryan Khan : बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेखही चॅटमध्ये असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं.

ठळक मुद्दे'आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आली आहेत. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी मिळायला हवी. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उजेडात आणण्यासाठी कोठडी गरजेची आहे."चॅटमधून काहीही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज संबध आढळून येत नाही," असे आर्यनच्या वकिलांनी म्हटले आहे. 

आर्यन खानचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी क्रूझ ड्रग्ज छापेमारी प्रकरणाच्या सुनावणीत युक्तिवाद करताना सांगितले की, छाप्यादरम्यान तपासणीत त्यांच्या क्लायंटकडून म्हणजेच आर्यन खानकडून काहीही जप्त केले गेले नाही. तो म्हणाला की त्याच्या क्लायंटची व्हॉट्सअॅप चॅट डाउनलोड झाली आहे आणि एजन्सी (एनसीबी) असे म्हणत आहे की असे काही व्यवहार आहेत जे त्याला आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जोडतात, परंतु आर्यन केवळ परदेशात शिकत होता आणि संपूर्ण कालावधीत कोणत्याही ड्रग्ज पुरवठा किंवा त्यांच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले नव्हते. "चॅटमधून काहीही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज संबध आढळून येत नाही," असे आर्यनच्या वकिलांनी म्हटले आहे. 

जुलै २०२० च्या चॅट्समध्ये बल्कमध्ये ड्रग्ज खरेदीबाबतची चर्चा केल्याचं सापडलंय असं एनसीबीने कोर्टात सांगितलं असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर धाड टाकत ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश असल्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. एनसीबीच्या कारवाईनं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आर्यन खानला एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं असून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. 

एनसीबीच्या वतीनं अनिल सिंह युक्तिवाद करत आहेत. क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ९ दिवसांची एमसीबी कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्यनच्या फोनमधून आक्षेपार्ह बाबी हाती लागल्या असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं. 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेले काही फोटो आक्षेपार्ह आहेत. आर्यनच्या फोनमध्ये सापडलेल्या लिंक्स आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहेत,' असा दावा सिंह यांनी केला.

'आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आली आहेत. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी मिळायला हवी. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उजेडात आणण्यासाठी कोठडी गरजेची आहे. ड्रग्ज तस्करांशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे. या प्रकरणातही छापेमारी सुरू आहे,' अशी माहिती सिंह यांनी न्यायालयाला दिली. आर्यनच्या चॅटमधून पैशांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे. बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेखही चॅटमध्ये असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थCourtन्यायालयadvocateवकिल