Nirbhaya gang rape type: Four convicts of Tihar Jail sentenced to death by hanging not eating food and not sleeping | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : तिहार कारागृहातील चार दोषींनी फाशीच्या धसक्याने केला अन्नपाण्याचा त्याग 
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : तिहार कारागृहातील चार दोषींनी फाशीच्या धसक्याने केला अन्नपाण्याचा त्याग 

ठळक मुद्देतिहार कारागृहातील निर्भया प्रकरणातील मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याबाबत कुणकुण लागली आहे. गरज पडल्यास उत्तर प्रदेशातून, महारष्ट्रातू अथवा बंगला येथील जल्लाद बोलावले जाऊ शकतात. 

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींचा निर्णय येणं अद्याप प्रतीक्षेत आहे. मात्र, तिहार कारागृहात वातावरण काहीसं बदलेलं आहे. तिहार कारागृहातील निर्भया प्रकरणातील मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार ठाकूर या चौघांना फाशी देण्याबाबत कुणकुण लागली आहे. त्यामुळे या चौघांची झोप उडाली असून भीतीने त्यांनी अन्नपाणी खाणं सोडले आहे.

चौघांची उडाली झोप; मारतात फक्त चक्करा
निर्भया सामूहिक बलात्कारातील अक्षय, मुकेश आणि मंडोली कारागृहातून तिहार कारागृहात हलविलेला पवन हे तीन दोषींना तिहार कारागृहातील वॉर्ड नंबर - ३ मधील सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. तर चौथा आरोपी विनय याला जेल नंबर - ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. य सर्वांची झोप उडाली आहे. फाशीची तारीख जवळ येत असल्याने यांच्या मानत भीती निर्माण झाली आहे. हे चौघे आपापल्या सेलमध्ये रात्र - रात्र जागून चक्करा मारत असतात. दोषींना औषध देण्यात आले नसून या चौघांना रक्तदाब योग्य राहील अशा पद्धतीचे द्रव आणि घन पदार्थ खाण्यास दिले जात आहेत. दया याचिकेवर अद्याप राष्ट्रपतींकडून अंतिम निर्णय येणे बाकी असून तिहार कारागृहात मात्र फाशीची जागा आणि इतर सामानाची तयारी सुरु झाली आहे. दोषींना १६ डिसेंबर अथवा २९ डिसेंबर (ज्या दिवशी निर्भयाचा मृत्यू झाला) या दिवशी फाशी दिली जाऊ शकते.

बक्सर कारागृहातून मागवणार फास

बिहार येथील बक्सर मध्यवर्ती कारागृहात फाशीसाठी लागणाऱ्या फास बनविण्याची तयारी सुरु आहे. बक्सर कारागृहातील कैदी हा फास तयार करीत आहेत. २०१३ साली संसदेवरील हल्ल्यातील दोषी मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा फास याच कारागृहातून बनविण्यात आला होता आणि नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठविण्यात आले होते. यावेळी निर्भयाच्या दोषींसाठी ‘फांसी का फंदा' तयार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे.

उत्तर प्रदेशातून मागवले जाऊ शकतात जल्लाद 

अधिकाऱ्याने म्हणणे आहे की, तसेही फाशी देण्यासाठी जल्लादाची काही गरज नाही. मात्र, गरज पडल्यास उत्तर प्रदेशातून, महारष्ट्रातू अथवा बंगला येथील जल्लाद बोलावले जाऊ शकतात. 

Web Title: Nirbhaya gang rape type: Four convicts of Tihar Jail sentenced to death by hanging not eating food and not sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.