उत्तर प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात टाकला रॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 10:44 IST2022-10-20T10:43:00+5:302022-10-20T10:44:38+5:30

महिला सामूहिक बलात्कारानंतर पोत्यात हातपाय बांधलेल्या आणि गुप्तांगात रॉड घातलेल्या भीषण अवस्थेत आढळली.

Nirbhaya case repeated in Uttar Pradesh gang raped and rod inserted into private parts | उत्तर प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात टाकला रॉड

उत्तर प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात टाकला रॉड

नवी दिल्ली : देशभर गाजलेल्या ‘निर्भया’ प्रकरणाची येथील उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पुनरावृत्ती झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.  दिल्लीची रहिवासी असलेली ३८ वर्षीय महिला सामूहिक बलात्कारानंतर पोत्यात हातपाय बांधलेल्या आणि गुप्तांगात रॉड घातलेल्या भीषण अवस्थेत आढळली.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी हा प्रकार दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणारा आहे, असे म्हणत पोलिसांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. दिल्लीत राहणारी सदर महिला १६ ऑक्टोबर रोजी तिच्या भावाच्या वाढदिवसाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गाझियाबादला गेली होती. तेथून परतताना ती रिक्षाची वाट पाहत होती, तेव्हा चार जणांनी तिचे कारमधून अपहरण केले. 

या चौघांसह आणखी एकाने तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार केला आणि अतोनात छळ केला.  तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. आयोगाने  वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे.

Web Title: Nirbhaya case repeated in Uttar Pradesh gang raped and rod inserted into private parts