Nirbhaya Case : The death penalty is confirmed! The Supreme Court rejected the review petition | Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Nirbhaya Case : फाशी निश्चित! क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

ठळक मुद्देक्युरेटिव्ह याचिका फेटाळल्याने दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं आहे. विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेले विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर  सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली असून याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती एन.व्ही. रमना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती आर भानुमति आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठावर आज दुपारी  विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. मात्र, याचिका फेटाळल्याने दोघांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं आहे. 

Nirbhaya Case : तिहार तुरुंगात चौघांना एकत्र फासावर लटकवून 'हा' जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड  


न्यायाधीशांच्या दालनात क्युरेटिव्ह याचिकांवर निर्णय घेतला जातो. अक्षय आणि पवन यांच्यासह इतर दोन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचे म्हणजे २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता चारही दोषींना फाशी देण्याच्या मृत्यूचे आदेश डेथ वॉरंट कनिष्ठ कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता या चौघांना फासावर चढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Read in English

Web Title: Nirbhaya Case : The death penalty is confirmed! The Supreme Court rejected the review petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.