शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Nirbhaya Case : 6 नराधमांनी बलात्कार केला होता; चौघांनाच ‘का’ फाशी दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 19:57 IST

Nirbhaya Case : अल्पवयीन आरोपीला सोडण्यात येऊ नये यासाठी त्याच्या सुटकेच्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर २०१५ रोजी दिल्लीच्या महिला आयोगाने ही सुटका रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ठळक मुद्दे१७ जानेवारी २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने (जलदगती न्यायालय) पाचही दोषींवर आरोप निश्चित केले. ज्या दिवशी सामूहिक बलात्काराची घटना घडली त्या रात्री हा मुलगा हेच पैसे आणण्यासाठी राम सिंगकडे गेला होता आणि त्यामुळेच हा मुलगा या प्रकरणामध्ये अडकला

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील उरलेल्या चार दोषींना आज (शुक्रवार) पहाटे ५.३० वाजता तिहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं. आज सकाळी ५.३० वाजता मुकेश सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनय शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंग (३१) या चारही आरोपांनी तिहार तुरुंगामध्ये फासावर लटवण्यात आलं. डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या निर्दयी कृत्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणामधील सहा आरोपींपैकी राम सिंग या मुख्य आरोपीने आत्महत्या केली तर सहावा आरोपी हा अल्पवयीन म्हणजे विधी संघर्ष बालक असल्याने त्याला तीन वर्ष बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला मुक्त करण्यात आलं आहे. अल्पवयीन आरोपीला सोडण्यात येऊ नये यासाठी त्याच्या सुटकेच्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर २०१५ रोजी दिल्लीच्या महिला आयोगाने ही सुटका रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली.

Nirbhaya Case : शुभदिन! न्याय मिळाला, विश्वास वाढला; तब्बल तीन महिन्यांनी अण्णा हजारेंनी सोडलं मौन

 

Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड

 

Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

 

Nirbhaya Case : अखेर न्याय जिंकला! नराधमांना फाशी दिल्यानंतर मोदींनी दिली प्रतिक्रिया

 

Nirbhaya Case: 'त्या' चौघांना एकत्र फासावर लटकवून जल्लाद पवनने मोडला पणजोबांचा रेकॉर्ड

 

पोलिसांनी कशी केली अटकेची कारवाई१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील मुनीरका भागात ६ जणांनी एका पॅरामेडिकलला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. निर्भयासोबत तिचा मित्र देखील होता. मात्र दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. निर्भयावर अमानुष अत्याचार करत सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या दोघांनाही चालत्या बसमधून बाहेर फेकण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी १८ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली पोलिसांनी राम सिंह, मुकेश सिंग, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या चौघांना सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केली. त्यानंतर त्याच्या अधिक चौकशीत २१ डिसेंबर २०१२ दिल्ली पोलिसांनी अक्षय आणि सहवा एका अल्पवयीन, विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पीडित तरुणीवर २९ डिसेंबर २०१२ पर्यंत दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला सिंगापूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं. तरीही सिंगापूरला उपचारादरम्यान निर्भयाची प्राणज्योत मालवली.

आत्महत्या केलेला दोषी राम सिंग 
कशी झाली विधी संघर्ष बालकाची मुक्तता३ जानेवारी २०१३ रोजी पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या, अपहरण आणि लूटमार या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला. १७ जानेवारी २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने (जलदगती न्यायालय) पाचही दोषींवर आरोप निश्चित केले. ११ मार्च २०१३ रोजी तिहार तुरुंगात या प्रकरणातला प्रमुख आरोपींपैकी एक असणाऱ्या राम सिंह याने आत्महत्या केली. त्यानंतर सात महिन्यांनंतर म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी या प्रकरणातील विधी संघर्ष बालकाला ज्युवेनाईल बोर्डाने दोषी ठरवलं आणि त्याची रवानगी तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली होती. अटक झाल्यापासून म्हणजे २१ डिसेंबरपासून या अल्पवयीन मुलाच्या अटकेचा कालखंड हा ३ वर्षांच्या कालावधीत धरण्यात आला. त्यामुळे २० डिसेंबर २०१५ रोजी या आरोपीची बालसुधारगृहामधून मुक्तता करण्यात आली. अल्पवयीन मुलगा राम सिंगसाठी काम करत असे. राम सिंगकडे या मुलाचे आठ हजार रुपये शिल्लक होते. हा मुलगा राम सिंगकडे या पैशांबद्दल चौकशी करायचा. ज्या दिवशी सामूहिक बलात्काराची घटना घडली त्या रात्री हा मुलगा हेच पैसे आणण्यासाठी राम सिंगकडे गेला होता आणि त्यामुळेच हा मुलगा या प्रकरणामध्ये अडकला, असंही या अधिकाऱ्याने सांगितले. हा मुलगा मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. मात्र सध्या तो दक्षिणे भारतामध्ये एका हॉटेलमध्ये काम करतो आहे. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपjailतुरुंगPoliceपोलिसArrestअटक