शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मध्य प्रदेशचा रमन राघव! 8 वर्षात 33 जणांची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 09:28 IST

मी 33 जणांना मुक्ती दिली, असं त्यांना हसत हसत पोलिसांना सांगितलं

भोपाळ: गेल्या 8 वर्षात 33 जणांची हत्या करणाऱ्या टोळीला मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओदिशात 33 जणांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सचे खून करुन ट्रकमधील मालाची विक्री करायची, अशी या टोळीची मोडस ऑपरेन्डी होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी या टोळीची चौकशी सुरू केली. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून अनेक हत्या प्रकरणांचं गूढ उलगडलं आहे. मध्य प्रदेशच्या मंडीदिप भागात टेलरिंगचं काम करणारा आदेश खामरा या टोळीचा म्होरक्या होता. 2010 साली त्यानं अमरावतीमध्ये पहिला खून केला. त्यानंतर दुसरी हत्या नाशिकमध्ये केली. यानंतर हत्यांचं सत्र सुरू झालं. यानंतर खामरा आणि त्याच्या टोळीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अनेकांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सची हत्या करुन त्यांची ओळख पटेल, असे पुरावे नष्ट करायचे आणि मग त्यांचे मृतदेह निर्जन स्थळी गाडून टाकायचे, अशा पद्धतीनं ही टोळी काम करायची. मात्र तरीही काही मृतदेह आढळून आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांकडून या हत्यांचा तपास सुरू असताना गेल्या आठवड्यात आदेश खामराला अटक करण्यात आली. त्यानं तब्बल 30 हत्यांची कबुली दिल्यानं पोलीस चक्रावून गेले. यानंतर त्यानं काल आणखी तीन खुनांची माहिती पोलिसांना दिली. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या जंगलातून खामराला ताब्यात घेण्यात आलं. यानंतर त्यानं एका पाठोपाठ एक खुनांची कबुली दिली. यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये शेजारच्या राज्यांमध्ये झालेल्या खुनांचा उलगडा होऊ लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोत कांस्य पदक पटकावणाऱ्या आणि सध्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करणाऱ्या बिट्टू शर्मा यांनी मोठ्या हिमतीनं खामराला अटक केली. विशेष म्हणजे खामराला ताब्यात घेताना शर्मा यांना त्यांची पार्श्वभूमी इतकी गंभीर असेल, याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. इतक्या जणांना संपवण्याचं कारण काय, असा प्रश्न पोलिसांनी चौकशीदरम्यान खामराला विचारला. त्यावर ती सर्व माणसं अतिशय हलाखीत जगत होती. त्यामुळे मी त्यांना मुक्ती दिली, असं उत्तर खामरानं हसत हसत पोलिसांना दिलं. 

टॅग्स :MurderखूनMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार