नवा ट्विस्ट! "३ गर्लफ्रेंडवर खर्च करायचा सर्व पगार..."; निकिताचा अतुलबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 17:09 IST2024-12-20T17:08:07+5:302024-12-20T17:09:42+5:30
Atul Subhash : निकिता सिंघानियाने अतुल सुभाषबाबत जी माहिती दिली त्यावरून या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. निकिताचा खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.

नवा ट्विस्ट! "३ गर्लफ्रेंडवर खर्च करायचा सर्व पगार..."; निकिताचा अतुलबाबत मोठा खुलासा
सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाषने आत्महत्या केली आहे. आत्महत्येआधी त्याने २४ पानी सुसाईड नोट आणि दीड तासांचा एक व्हिडीओ देखील बनवला. या व्हिडिओमध्ये अतुलने पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग आणि सासरच्या लोकांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. मात्र आता निकिता सिंघानियाने अतुल सुभाषबाबत जी माहिती दिली त्यावरून या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. निकिताचा खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान निकिताने अतुल सुभाषवर फसवणूक केल्याचा आणि त्याच्या तीन गर्लफ्रेंड असल्याचा आरोपही केला. निकिताने पोलिसांना सांगितलं की, "मला आणि माझ्या कुटुंबीयांना या प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे, आम्ही अतुलकडे पैसेही मागितले नाहीत किंवा आम्ही कधीही कोणतीही मागणी केली नाही, उलट अतुल आणि त्याच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे १० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता."
याशिवाय निकिताने म्हटलं आहे की, अतुलच्या बंगळुरूमध्ये तीन गर्लफ्रेंड होत्या आणि तो सर्व पैसे त्यांच्यावर खर्च करत असे. तो माझा पगारही हिसकावून घेत असे. जेव्हा मी माझ्या आईकडे पैसे मागायची तेव्हा अतुल ते पैसेही घ्यायचा. सासरचे लोकही माझ्या वडिलांकडून १० लाख रुपये हुंड्याची मागणी करत होते, तर आम्ही लग्नासाठी ५० लाख रुपये खर्च केले होते. पैसे न दिल्यास माझ्या सासरच्यांनी घटस्फोटाची धमकी दिली.
निकिता आणि अतुल यांची भेट सुभाष मॅट्रिमोनियल साइटवर झाली. यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी मॉरिशसला गेले होते. मॉरिशसमध्ये निकिताने अतुलला लग्न करायचं नव्हतं सांगितलं. तिला अतुलशी लग्न करायचे नव्हतं. पण वडिलांची तब्येत खराब असायची. अशा परिस्थितीत घरच्यांच्या दबावाखाली येऊन अतुलशी लग्न केल्याचं सांगितलं.