बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 02:59 PM2021-05-19T14:59:12+5:302021-05-19T15:42:34+5:30

Robbery Case : जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी अमनदीप रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nihangas cut the hands of a finance company employee in amritsar 1500 cash loot | बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला 

बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला 

googlenewsNext
ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले होते.मंगळवारी आरोपी दुचाकीवरुन नंगली गावात पोहोचली. आनंदने दोन ठिकाणाहून १५०० रुपये जमा केले होते. अमनदीप रुग्णालयात जखमीवर १२ तास शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हात जोडला आहे.

अमृतसरच्या कंबो पोलिस ठाण्यांतर्गत नंगली गावाजवळील मजीठा रोडवर फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. लुटारूंनी त्या कर्मचाऱ्याचा हात कापल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याच्या बॅगेत फक्त १५०० रुपये होते. जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी अमनदीप रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद झाले होते. दुसरीकडे कंबो पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यादविंदर सिंग यांनी सांगितले की, आरोपींना अटक करण्यासाठी छापा टाकला जात आहे. पश्चिम बंगालच्या चुंगी करवा येथील रहिवासी आनंद विश्वास हा अमृतसरमधील आकाश अ‍ॅव्हेन्यू येथे राहतो. जवळजवळ दोन वर्षे तो एका फायनान्स कंपनीत पैसे वसूल करण्यासाठी काम करतो. तो दररोज बाईक चालवित मजीठा आणि अमृतसरशी संबंधित खेड्यात जात असे, पैसे गोळा करीत असे आणि संध्याकाळी हे पैसे मालकाकडे सुपूर्द करत असे.

मंगळवारी आरोपी दुचाकीवरुन नंगली गावात पोहोचली. आनंदने दोन ठिकाणाहून १५०० रुपये जमा केले होते. तो नंगली गावातून बाहेर येताच दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दुचाकी चालवणाऱ्याच्या मागे बसलेल्या तरूणाने निहंगचा वेश केला होता. संधी मिळताच आरोपींनी आनंदाला घेरले आणि दुचाकीच्या हँडलवर लटकलेली बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने बॅग देण्यास विरोध केला तेव्हा निहंगच्या वेशात असलेल्या तरूणाने कृपाणने त्याचा हात मनगटापासून वेगळा केला. नंतर दुचाकीस्वार पिशव्या हिसकावून पळ काढला.

अमनदीप रुग्णालयात जखमीवर १२ तास शस्त्रक्रिया चालली. त्यानंतर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून हात जोडला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Nihangas cut the hands of a finance company employee in amritsar 1500 cash loot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.