शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

बंद घरांची 'रेकी' करून रात्री चोरी करणारी टोळी जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:10 PM

Crime News Khamgaon चोरट्यांना जेरबंद करून शहर पोलिसांनी ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बंद असलेल्या घरांची रेकी करून रात्री घरफोडी करणाºया एका टोळीच्या मुसक्या आवळ्यात शहर पोलिसांना शुक्रवारी उशीरा रात्री यश आले. टोळीतील पाच अट्टल चोरट्यांना जेरबंद करून शहर पोलिसांनी ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शहर आणि परिसरात गत काही दिवसांत चोरीच्या घटना घडल्या. कोरोना लॉकडाऊन कालावधीत घडलेल्या घटनांचा शोध घेताना शहर पोलिसांनी डी.बी.पथक सक्रीय केले. दरम्यान, खामगाव येथील संदीप महादेव पांड यांनी २ आॅक्टोबर रोजी त्यांचे भाचे दर्शन अशोक वाठ यांच्या बंद घरात ५० हजाराची चोरी झाल्याची तक्रार  नोंदविली.  याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर डी.बी. पथकाचे पीएसआय गौरव सराग आणि त्यांच्या पथकाने  वाठ यांच्याकडे घडलेल्या घटनेसह शहरातील आणखी काही चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला. त्यावेळी शहरातील डीपी रोडवरील एका बंद घराच्या बाजूने चौघे जण संशयास्पद स्थितीत बसलेले आढळून आले. त्यामुळे डी.बी. पथकाने चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता डॉ. गायकवाड यांच्या हॉस्पीटल मागील घरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील मुद्देमाल त्यांचा साथीदार चेतन राजेश डाकुर(१९) रा. रावणकडे असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चेतन डाकुर याला अटक केली त्याच्याकडून सोने चांदी दागिणे असा ५१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया , अपर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुनील अंबुलकर, उपनिरिक्षक गौरव सराग, पोहकॉ गजानन बोरसे, पो.ना. राजेंद्र टेकाळे, संदीप टाकसाळ, सुरज राठोड, नवाज शेख, दीपक राठोड, प्रफुल टेकाडे, अरविंद बडगे, संतोष वाघ, गौरव निर्मळ यांनी ही केली.

 दिवसा रेकी आणि रात्री चोरी!- शहराच्या विविध भागात दिवसा फिरून बंद असलेल्या घरांची रेकी करायची. हे घर रात्रीच्या वेळी नियोजनबध्द पध्दतीने फोडून चोरीचे उद्दीष्ट गाठायची पध्दत या टोळीतील अट्टल चोरट्यांची आहे.

 गत काही दिवसांमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डी.बी. पथकाला सक्रीय करण्यात आले. दरम्यान, दिवसा बंद असलेली घरे हेरून रात्री चोरी करणाºया एका टोळीला अटक करण्यात आली. या अट्टल चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.- सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी