शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 18:01 IST

युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देएनआयएने देविंदरविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला १२ जानेवारीला अटक करण्यात आली होती.

नवी दिल्ली -  दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाअंतर्गत जम्मू काश्मीरचे डीएसपी देविंदर सिंहला अटक केल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या या निलंबित अधिकाऱ्याविरुद्ध आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करणार आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. एनआयएने देविंदरविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे.

श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला १२ जानेवारीला अटक करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे हा पोलीस अधिकारी डीएसपी दर्जाचा असून राष्ट्रपतींकडून वीरता पुरस्कारही मिळालेला आहे. या अधिकाऱ्याला दहशतवाद्यांसह त्याच्या कारमध्ये पकडण्यात आले होते. आयबीला मिळालेल्या माहितीनुसार, २००५ साली दिल्ली पोलिसांनी सात दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांकडून AK-47 आणि मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर आयबीला एक चिठ्ठीही मिळाली होती. दविंदर यांनी ती चिठ्ठी लिहिली होती. हे सर्व दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधीत असल्याचं म्हटलं जात होतं.या अतिरेक्यांमध्ये हाजी गुलाम मोइनुद्दीन डार उर्फ जाहिद हा एक दहशतवादी होता. त्याच्याकडे देविंदर याचं एक पत्र मिळालं होतं. हे पत्र त्याने त्याच्या लेटहेडवर लिहिलेलं होतं. हाजी गुलाम हा पुलवामा इथला रहिवाश आहे. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि वायरलेस सेट आहे. त्याला कुठल्याही चौकशीशिवाय जावू द्या, थांबवू नका असं त्या पत्रात म्हटलं होतं. हे पत्र त्याने कुठल्या उद्देशाने दिलं होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हिजबुलच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या पोलिस अधिकारी दविंदर सिंगबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी आणि सिंग यांच्यात १२ लाख रुपयांचे डील झाल्याचे सांगण्यात य़ेत आहे. काश्मीरमधील कुलगाम येथे अटक केल्यानंतर डीएसपी सिंगची चौकशी सुरू आहे. १२ लाख रुपयांच्या बदल्यात दविंदर सिंग दहशतवाद्यांना सुरक्षित चंदीगढला पोहचवणार होता. त्यासाठी त्याने चार दिवसांची सुट्टी घेतली होती.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीPoliceपोलिसJammu Kashmirजम्मू-काश्मीर