Newly married woman commits suicide; A case has been registered against husband and member of in-law family | नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
नवविवाहितेने केली आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देमुंबईच्या सांताक्रूझ येथील वाकोला येथे राहणाऱ्या राजबहादूर रामजतीन सिंह (65) यांची मुलगी रेश्मा (29) हीचा नालासोपारा मधील सुशील सिंग याच्या सोबत लग्न झाले होते. रेश्मा हिने 17 मे ला ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे.

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्था विभागातील श्रीपाल ट्रेझर इमारतीच्या रूम नंबर डी/303 मध्ये 17 मे ला संध्याकाळी नवविवाहिता शिक्षेकेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलीच्या वडिलांनी मानसिक व शारीरिक छळ करून हुंड्याचा तगादा लावल्याने आत्महत्या केली म्हणून शनिवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी पती व तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या सांताक्रूझ येथील वाकोला येथे राहणाऱ्या राजबहादूर रामजतीन सिंह (65) यांची मुलगी रेश्मा (29) हीचा नालासोपारा मधील सुशील सिंग याच्या सोबत लग्न झाले होते. 3 फेब्रुवारी 2018 ते 17 मे 2019 यादरम्यान नवऱ्याने व तिच्या सासरच्या मंडळींनी वेळोवेळी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करू लागल्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. यामुळे रेश्मा हिने 17 मे ला ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे. तपास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नवरा सुशील जितेंद्र बहादूर सिंग, सासू उर्मिला जितेंद्र सिंग, सासरे जितेंद्र बहादूर सिंग, दिर आतिषकुमार आणि नणंद सोनू सिंग यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


Web Title: Newly married woman commits suicide; A case has been registered against husband and member of in-law family
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.