तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या तरूणाने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 18:37 IST2021-08-11T18:36:58+5:302021-08-11T18:37:27+5:30
इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता.

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या तरूणाने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर...
जुगारात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकजण भीकेला लागले तर अनेकांनी आपलं जीवन संपवलं. अशीच एक घटना इंदुरमधून समोर आली आहे. इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता. तो एमपीईबीमध्ये कार्यरत होता. त्याचं लग्न तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं.
पोलिसांना मृताच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की, ऑनलाइन सट्टेत हरलेल्या पैशांमुळे मृतक तणावात होता. त्याबाबत त्याने पत्नी आणि एका मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेजही पाठवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक दिव्यांशु मेहता एमपीईबीमध्ये सीसीआय पदावर कार्यरत होता. त्याच्या मित्राने सांगितलं की, पहिल्यांदा दिव्यांशु ७० हजार रूपये हरला होता. त्यानंतर पुन्हा तो तेवढेच रूपये सट्ट्यात हरला होता. ज्यामुळे तो तणावात होता.
३ महिन्यापूर्वीच त्याने प्रेम विवाह केला होता. सध्या मृत्यूमागे कोणताही कौटुंबीक तणाव समोर आलेला नाही. पण त्याच्या एका मित्रानुसार, ऑनलाइन सट्टा खेळत असल्याने आणि त्यात पैसे गमवाल्याने तो तणावात होता. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेतली असून चौकशी सुरू केली आहे.